या शिरवलीच्या पोरांना.. हाय चट लय हो पार्टीची आज पार्टी ही कराची.. सोय वाऱ्याव जायाची आरं रविन ठाकूर रं.. तु ऑर्डर दे मुंडीची ||
या सागर पाटलाला.. हाय हौस हो पोपटीची आरं घेऊन आला तो.. कोंबरी बिना सालटीची या संदेश पाटलाला.. जबाबदारी दिली मोलाची आरं घेऊन आला तो.. बाटली थंड्याची || 1 ||
या जितेश गोंधळीला.. जबाबदारी दिली भाकरीची आरं घेऊन आला तो.. भाकरी हो तांदळाची या बरमा बंडगर ला.. नाय माहीती वालाच्या शेगांची आरं घेवून आला तो.. शेंगा त्या पावट्यांची || 2 ||
या सुशील दुर्गेला.. जबाबदारी दिली वाटल्याची आरं घेऊन आला तो.. कोशिंबीर टाॅमेटोची या विनोद दुर्गेला.. हाय आवड गोड खायाची एका झटक्यात संपवितो.. आरं डब्बी तो श्रीखंडाची || 3 ||