चक्रीवादळ…
– छोटीशी काॅमेडी
( — चक्रीवादळानंतर भाचा ( वय जेमतेम ४-५ वर्षे) मामाच्या घरी येतो.. मामा सोफ्यावर बसून काहीतरी करत असतो.. –)
भाचा :- मामा, तुला माहीत आहे का आमच्या गावानं जाम मोठा वारा सुटलेला..
भाचा :- म… एक घराचा पत्रा उरला ना डायरेक्ट ईमानाला लागला..
मामा :- काय बोलतसं ..? ( आश्चर्य चकित होऊन)
भाचा :- म… ईमान डायरेक्ट खाली कोसाळला..
मामा :- म… तुनी काय केला..?
भाचा :- मीनी उचलला ना बाजूच्या भंगारवाल्याला दिला..
मामा :- दीर फासलीचा तू….ईमानाच्या टायर एवढा पण तुझा वजन नाय आणि ईमान उचलून भंगारवाल्याला दिला बोलतसं…
भाचा :- आरं.. खराचं.. भंगारवाल्यानी मला ३० रूपं दिलं…
मामा :- हो, का…. काय केला म…. ?
भाचा :- मीनी एक कार ईकत घेतली..
( –मामा हसत- हसत विचारतो..–)
मामा :- तुझ्या बापासनी घेतली होती का ३० रूपाला मर्सिडीज…
( –समोर भाच्याचा बाप येताना दिसतो..– )
मामा :- या… या… भावजी काय म… काय चालले..?
भावजी :- काय नाय… चालले आपला पोटा पुरता…
…काय चालले मामा-भाच्याचा ..?
मामा :- काय नाय… बोलतं ईमान कोसाळला….उचलून भंगारवाल्याला दिला….
भावजी :- हो, ना… मीच बोललो त्याला जा दे भंगारवाल्याला…..
( –मामा वैतागून उठून जातो.. जाता जाता बोलतो– )
..च्यायला डोक्यावं परल्यानं का ही दोघा…
मामा :- काय ताई , तुनी काय येडयाशी लगीन केले का काय…?
मामा :- ती तुमची सोंगा …बोलतान… ईमान कोसाळला, उचलून भंगारवाल्याला दिला…
बहिण :- आरं.. दादा… तो पप्याला बर्थडे ला ईमान नव्हता का दिला… तो टेरेसवं ठेवला होता… त्याला पत्रा लागून खाली परला ना तुटला …. तोच भंगारवाल्याला दिला….
( — मामा डोके धरून बसतो..त्याला म्हशीला चारा घालायला जायचा होता पण समोरच्या टोंग्याला ( भावजी ला) बघून त्याचा मूडच गेला..–