प्रवास – ब्राहण ( तवळी ) डोंगराचा…
कालचा दिवस खुप सुंदर होता.
काल ज्या आठवणी आपण आयुष्यात तयार केल्या आहेत त्या आठवणी परत निर्माण होऊ शकत नाही कारण त्या डोंगरावर परत ज्याण्याची हिम्मत आपण परत करू शकू असे मला तर वाटत नाही एवढा चित्त थरारक अनुभव होता तो..
पनवेल तालुक्यातील वांगणी ( भेकरा ) या आदीवासी वस्ती असलेल्या गावातून आपण प्रवासाला सुरुवात केली.. रस्ता तर कुणालाच माहीत नव्हता.. जेव्हा रस्ता कोणालाच माहित नसतो.. तेव्हा डोंगरावर जाणारा एकमेव पर्यायी मार्ग असतो तो म्हणजे नदीचे पात्र.. तसा रस्ता अवघडच असतो पण निश्चित असा असतो.. चूकण्याचे Chances जरा कमीच , फक्त अंतर तेवढे वाढते.. शिवाय चालण्याची गती ही मंदावते.. जेवढा वेळ सरळ रस्त्याने जायला लागतो त्याच्या तीन पटीने जास्त लागतो पण मजा मात्र दहा पटीने जास्त येते..
जवळ जवळ ५ तास नदिच्या पात्रातील अवघड असे अडथळे पार करत आपण पुढे पुढे जात होतो .
मनात फक्त एकच विचार होता आपल्याला त्या डोंगराचा शिखर गाठायचा आहे.
नदीच्या पात्रातील भल्या मोठ्या दगडी आणि काही ठिकाणंचे चिंचोले रस्ते पार करणे खुपच अवघड होते, परंतु आपण जिद्द सोडली नाही.
एखाद्या युद्धामध्ये सैन्य जसे शत्रूवर तुटून पडतात व हळूहळू पुढे सरकून शत्रूच्या क्षेत्रावर कब्जा मिळवतात. अगदी त्याच प्रमाणे आपण सगळे जण हळूहळू पुढे जात होतो .
थकणाऱ्याला शब्दाचा डोस पाजून त्याच्यामध्ये जोष निर्माण करत होतो आणि त्याची हिम्मत वाढवत होतो.
मधेमधे काॅमेडी करत प्रवासात येणारा थकवा दूर करत होतो.
नदीच्या पात्रातील प्रवास हा फक्त कठिणच होता असे नाही तर अधेमधे निसर्ग रम्य असे छोटे छोटे झरे सुद्धा होते ज्या खाली बसून आपण आंघोळीची मज्जा सुद्धा घेतली आणि वन भोजनाचा आनंद सुद्धा…
काही जणांचा तर जोष बघून एवढा अवघड प्रवास सुद्धा सोपा वाटत असे..
प्रवासाचा शेवट मात्र आनंददायी झाला नाही कारण ठरवलेल्या टार्गेट पाॅईट वर आपण पोहचू शकलो नाही कारण वेळेची कमतरता..
ठरवलेल्या पाॅईट वर पोहचण्यासाठी अजून एक ते दिड तास लागणार होता जर आपण तिथे गेलो असतो तर परत येण्यासाठी रात्र झाली असती आणि एवढया कठिण रस्त्यातून खाली उतरने अवघड झालं असतं..